भाग्यश्री पेठकर

My blogs

About me

Gender Female
Industry Communications or Media
Location नागपूर, महाराष्ट्र, India
Introduction नमस्कार. मी भाग्यश्री पेठकर. एक जर्नालिस्ट आहे. दै. लोकसत्ता, नवराष्ट्र, तरुणभारत इत्यादी वृत्तपत्रांमध्ये मुद्रितशोधक ते उपसंपादकाचे काम केले. 15 वर्षे पत्रकारितेत घालविल्यानंतर आता मुक्त पत्रकारिता करते. विविध मासिकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये लेखन करते. 2011 साली दै. 'सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीत 'जगण्यातले काजवे' हे सदर वर्षभर चालले. माझा नुकताच 'काया' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्याला प्रख्यात कवी, पटकथालेखक श्री. गुरू ठाकूर व महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी दासू वैद्य यांनी पाठराखण दिली आहे. कथा, कविता, ललिललेखन, विविध विषयांवरचे अनेक लेख आतापर्यंत लिहिले आहेत. वक्तादशसहस्रेषु ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांच्यासोबत त्यांची लेखनिक म्हणून चार वर्षे काम केले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रभरातील वृत्तपत्र, मासिके यात त्यांच्यावर आलेले अग्रलेख आणि इतर लेखांचे मिळून अभिवादन या नावाच्या पुस्तकाचे संपादन केले. आता वर्ड्स अँड व्ह्युज नामक एक व्यवसाय आम्ही सुरू केलेला आहे. त्यात आम्ही क्रिएटिव्ह रायटिंगबाबतची कामे करतो त्या अंतर्गत इंग्रजीमधून मराठी व हिंदीत भाषांतरे करणे, पुस्तकांचे संपादन, मानपत्र लिहिणे, जाहिरातींचे स्लोगन्स, ऑडिओ व्हिज्युअल आणि प्रिंट मिडियातील जाहिरातींचे लेखन, मालिका, चित्रपटांचे लेखन, कंपन्यांचे ब्रोशर्स, पंच लाईन्स आदी कामे करतो.
Interests लेखन, वाचन, गाणी ऐकणे, निसर्गसान्निध्य.
Favorite Movies इंग्लिश विंग्लिश, लंच बॉक्स
Favorite Music शास्त्रीय गायन, गझल, हिंदी अर्थपूर्ण गाणी
Favorite Books मी अल्बर्ट एलिस, आहे मनोहर तरी, माचीवरला बुधा, मृत्युंजय, इत्यादी अनेक