Pustakexpress

My blogs

About me

Gender Male
Industry Engineering
Location Kolhapur, Maharashtra, India
Introduction पुस्तकएक्सप्रेस या ब्लॉगवर तुम्हाला विविध मराठी पुस्तकाचे पुस्तक परिचय वाचायला मिळतील.काही एक दोन इंग्रजी पुस्तकांचे परिचय सुद्धा दिसतील ती फक्त मला भावलेली पुस्तके असतील. फक्त मराठी पुस्तकांविषयीचं का ..? तर मराठी पुस्तकांचे विश्व इतके विशाल आहे जे वाचुन पुर्ण करायला सात जन्म सुद्धा अपुरे पडतील. आठवड्याच्या प्रत्येक रविवारी तुम्हाला एका मराठी पुस्तकाचा पुस्तक परिचय येथे वाचायला मिळेल. एखाद रविवार पोस्ट नाही दिसली तर त्याबद्धल आताच माफी मागतो. एका नामांकित IT कंपनीमध्ये काम करीत असल्यामुळे एखाद रविवार सुटून जातो पण वाचनामध्ये खंड नाही पडत. मी श्रीजीवन शिवाजीराव तोंदले. मी मुळचा कोल्हापूरचा आहे. नोकरी निमित्य मी पुण्यामध्ये स्थायिक आहे.जसं शिक्षण पुर्ण करून पुण्यामध्ये नोकरीसाठी आलो आणि पुस्तकांशी एक अतूट नातं जोडलं गेलं. कामाच्या ठिकाणी रिकाम्या वेळेमध्ये,घरी,प्रवासमध्ये जिथे जिथे आणि जस जसा वेळ मिळत गेला तस तसं वाचत गेलो. पुस्तकांनी मला बळ दिलं आयुष्यामधील अंधाराला रोखण्याचं.पुस्तकांमुळे माझे आयुष्य समृद्ध झाले. अजुन खुप पुस्तकं वाचायची आहेत. माहिती आहे, मराठी पुस्तकविश्व खुप मोठं आहे. ते या एका जन्मात वाचुन पुर्ण होणार नाही. पण जोपर्यंत हे आयुष्य आहे तोपर्यंत मी वाचत राहीन.
Favorite Books झोम्बी, झाडाझडती, व्यक्ती-वल्ली, चेटकीण, दंशकाल, तणकट