Vilas Lakshmanrao Kondvilkar
My blogs
Blogs I follow
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Non-Profit |
| Occupation | Social Worker |
| Location | Mumbai, Maharashtra, India |
| Introduction | शालेय जीवनातून बाहेर पडल्यानंतर कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी करावी लागली.सुदैवाने मुंबई पोर्ट ट्रस्टची नोकरी मिळाली. या काळात वाचन सुरु होते. पण लिहिणे जमत नव्हते. लिहित होतो पण लिखाण पूर्णावस्थेत येत नव्हते. तसेच फक्त मित्राच्या किंवा आदरणीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि एखाद्या समारंभानिमित्त कविता करायचो.कविता वाचून झाल्यावर ते सुवर्णपान फाडून टाकायचो. लिहिलेल्या कोणत्याही पानांचा संग्रह राहिला नाही. अनेक मित्रांनी शीघ्र कवीची उपमा दिली. तसेच आदरणीय गोदी कामगार नेते कॉम्रेड एस. आर. कुलकर्णी यांनी कामगार कवी म्हणून गौरविले. पण ते भाषणात ! प्रमाणपत्र नाही ! त्यामुळे मिरविण्यासारखे पुरावे काही नाही.अगदी लिखाणाची कागद सुद्धा नाहीत. माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण होवून तो घरी आला. त्याला माझे उपलब्ध साहित्य वाचायला मिळाले आणि त्याने गुगलवरील ब्लॉगची कल्पना मला सांगितली. पण संगणकाबद्दल मी अज्ञानी ! संगणकावर फक्त फ्रीसेल गेम खेळण्यापलीकडे बाकी काही माहित नव्हते. माझ्या मुलाने आणि मुलीने मला ब्लॉगवर लिहायला शिकविले आणि सांगितले कि, या ब्लॉगवर जगभरातील शेकडो, हजारो, लाखो लोक वाचत असतात. मी ब्लॉगवर लिहिले आणि आश्चर्यचकित झालो. विसाव्या शतकातील मी एक अल्पशिक्षित, एकविसाव्या शतकामधील इंटरनेटच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आलो.हे सर्व आई वडिलांच्या पुंण्याईमुळे मिळाले. |
