फ़ुलपाखरू
My blogs
| Introduction | आपल्या सर्वांच्या मनात एक फ़ुलपाखरू दडलेले असते आणि ते नेहमी मुक्त असे उडू पाहत असते. त्याला स्वातंत्र्य हवे असते. त्याचप्रमाणे आपल्या मनाला विविध रंग असतात......फ़ुलपाखराप्रमाणे. परंतु काहींना संधी न मिळाल्याने, मनाजोगती नोकरी, व्यवसाय किंवा तत्सम गोष्टी करायला न मिळाल्याने नैराश्य येते. या नैराश्याला काहीच अर्थ नाही. कारण तसे केल्याने आपल्याला त्या संधी पुन्हा गवसणार नसतात. परंतु सर्वांनी जर फ़ुलपाखराचा आदर्श घेतला तर मला असे वाटत नाही की कोणाच्या जीवनात चिंता, काळजी या गोष्टी येतील. कारण फ़ुलपाखरू बनण्यासाठी त्यालादेखील कष्ट घ्यावे लागतात, मग आपण का करू शकत नाही कष्ट! फ़क्त आपल्या मनाची तशी तयारी मात्र हवी हं! हा ब्लॉग एका विशिष्ट चाकोरीतील नाही. तर फ़ुलपाखरू जसे एकाच फ़ुलावर कधीच बसत नाही त्याप्रमाणे विविध विषयांना हाताशी धरून तयार केलेला आहे. आपल्या सभोवती काय काय घडत आहे याचा घेतलेला आढावा म्हणजेच "मनातील फ़ुलपाखरासंगे....."होय. |
|---|

