सतीश लळीत, माध्यमकर्मी, हौशी पुरातत्व संशोधक

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Location सिंधुदुर्गनगरी, ओरोस, महाराष्ट्र, India
Introduction सतीश लळीत, मोबाईल : 94224 13800. माझा ई-मेल : satishlalit@gmail.com,
Interests सतीश रामचंद्र लळीत यांचे जन्मगाव सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग. शिक्षण : बी.ए. (मराठी वाङमय) - मुंबई विद्यापीठ. वृत्तपत्रविद्या पदविका - पुणे विद्यापीठात द्वितीय. माहिती तंत्रज्ञान पदविका. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातून उपसंचालक पदावरुन निवृत्त. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणुन काम पाहिले. • दै. सकाळ (कोल्हापूर), दै. केसरी (सांगली) आणि दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई येथे उपसंपादक म्हणून सात वर्षे काम केले. • छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या चरित्रपर वेडात मराठे वीर दौडले सात या पुस्तकाचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याहस्ते प्रकाशन. • लोकराज्य या राज्य शासनाच्या मासिक मुखपत्राचा संपादक म्हणून 2006 ते 2008 अशी दोन वर्षे काम पाहिले. • मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग या संस्थेचा संस्थापक कार्यवाह म्हणून काम पहात आहे. या केंद्राच्यावतीने आतापर्यंत बांदा, कुडाळ, कणकवली, कसाल व मुंबई येथे सहा मालवणी बोली साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन. • सिंधुदुर्ग पर्यटन या पुस्तकाचे लेखन. पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याहस्ते दि. 24 जून 2009 रोजी सिंधुदुर्गनगरी येथे झाले. •1991 मध्ये सरळ सेवेने वर्ग 1 अधिकारी म्हणून माहिती व जनसंपर्क विभागात प्रवेश. •सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. पणजी, गोवा येथे महाराष्ट्र परिचय केंद्राचा प्रमुख म्हणून चार वर्षे काम पाहिले. कोल्हापूर विभागाचा उपसंचालक, मंत्रालयात उपसंचालक (वृत्त) पदाचा कार्यभार सांभाळला •महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 2007 चा उत्तम कार्यकर्ता अधिकारी पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याहस्ते प्रदान. • राज्य शासनाच्या 2008 सालच्या यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते सन्मानित. • ट्रेकिंगचा छंद. आतापर्यंत 65 किल्ले पाहिले.